Sunday, July 17, 2011

आई

आई

आईची आठवण म्हणून ठेवलेल्या साडीचा, झब्बा शिवला झकास
म्ह्टलं कार्यक्रमांना जातांना घातला की आई सोबत असल्याचा आंनद होईल.
शिवून कडक इस्त्री केलेला झब्बा अंगावर चढवला
आणि अचानक खांद्यावर प्रचंड ओझं आल्यासारखं वाटल,

समोर दिसू लागलं
सकाळ पासून स्वयंपाक घरात घामाघूम झालॆल शरीर,
सगळ्याच्या मनासारखं आणि त्यांच्या वेळात
स्वत:ला जळ्णारं मनुष्य सद्रुश रिंगण

घराबाहेर पडताच लोकांच्या ओंगळवाण्य़ा नजरांनी
काचलेल रक्तबंबाळ काळीज,
राग, लोभ, शारिरिक अत्याचारांनी होरपळलेल मनं आतून
पूर्ण भिजून गेलेल.

हट - साला, चटदिशी झब्बा काढून फेकला
कपड्याच्या ढिगा-खाली....
आणि आई दबत-दबतच गेली...

-ऋतू