Tuesday, March 22, 2011

हरवलेला कागद


हरवलेला कागद

दारू पिऊन डोकं जड झालं
की कविता लिहीण्याचा मूड होतो...
दरवेळेस कागद सापडतोच... असं नाही!
मग ग्लासमध्ये दारु ओतल्यासाखा मी-
मेंदूच्या कागदावर शब्द ओतत सुटतो...
सकाळी कागद सापडतोच... असं नाही!
एक कविता हरवल्याच दु:ख दिवसभर शरीरभर वेदना देतं...
सामान्य लोकं कदाचित त्यालाच ’हँगओव्हर’ म्हणत असावेत...
दिवस तसाच जातो,
पुन्हा रात्र,
पुन्हा दारु,
पुन्हा कविता,
पुन्हा हरवलेला कागद...
ह्या कवितांचा एक संग्रह काढीन म्हणतोय...
चालेल की,
असही, शब्दांना वास कुठे लागतो?

-प्रथमेश किशोर पाठक.

अंतीम सच...

ऋतू की एक हिंदी कविता... कविता अपनी खुदकी नाद, लय और जुबान लेकर ही प्रगट होती है


अंतीम सच...

ये जिंदगी है... एसेही चलेगी...
कौन जाने?
कब, कैसे लेगी करवटे झुलती नदि्योंसी...
कुछ घर मनायेंगे मातम,
कुछ खुशियोंसे फुलेंगे,
कुछ जलायेंगे चिराग नयी दिशाके,
कुछ दिशाहिन हवाके झोंकोसे बेसहारा
हर किसी करवट पर...
अंतमे जाकर मिलेगी काल के सागरोको
अब जिंदगी भी मोहताँज है...
बंद हो जायेगी कोठडीमे...
जहाँ सुरज की रोशनी भी कभीकबार पोहोंचती है...
कोशीश करती रेहती है...

-ऋतू

तू...


तू...

आळस दिला गात्रांनी,पण स्पर्शात अजूनी तू,
पुन्हा एकदा रात्रीसम, मिठीत मजाला घे तू

चिरतरूण रात्र अजुनी कुशित मजला घेते,
बावरलेला मी, तू ती रात्र होऊनी जाते,
आठवणीत त्या रात्रीच्या फक्त तू अन तू
पुन्हा एकदा रात्रीसम, मिठीत मजाला घे तू

मोकळ्या केसात तुझ्या मी रात्र शोधीत होतो,
निशिगंधाची नक्षत्रे मी तयात माळीत होतो,
चंद्रकोर ती भाळावरली चांदणं ल्याली तू,
पुन्हा एकदा रात्रीसम, मिठीत मजाला घे तू

उत्कंठा वाढत होती, रात्रीसत्या जाळीत होती,
घेता मिठीत तुजला, रात्रही गाली लाजत होती,
कुशितल्या स्वप्नांची मग पहाट केली तू
पुन्हा एकदा रात्रीसम, मिठीत मजाला घे तू

-प्रथमऋतू



Wednesday, March 2, 2011

काही यमके-कुसुमाग्रज


कुसुमाग्रजांच्या काही विनोदी चारोळ्या...नितळ हास्यासाठी...

विवाह व्हाया पूर्ण यशस्वी
 
काय असावी शर्त?
एक पक्ष अती मठ्ठ असावा
  दूजा असावा धूर्त!
****************************************************
लयला मजनू कधी विवाहीत
  झाले असते काय?
असते तर ते लयला मजनू
  उरले असते काय?

****************************************************
मदिरेवर का रोष एवढा
  मी पुसले नेत्याला,
उत्तर देण्याइतुकी नव्हती
 शुद्ध राहिली त्याला!

-कुसुमाग्रज

****************************************************

Nida Fazali....

A poem by Nida Fazali expressing how one can nurture relationships and live life fully!
 
बात कम किजीए, जहनत को छुपाते रहिये,

अजनबी शहर है ये, दोस्त बनाते रहिये


दुश्मनी लाख सही, खत्म ना किजीए रिश्ता,

दिल मिले ना मिले, हाथ मिलाते रहिये

 
ये तो चेहरे फ़कत अक्स है, तस्वीर नही,

इस पे कुछ रंग अभी और चढाते रहिये

 

गम है आवारा, अकेले में भटक जाता है,

जिस जगह रहिये वहा मिलते मिलाते रहिये


जाने कब चाँद बिखर जाये घने जंगल में

अपने घर के दर--दिवार सजाते रहिये

-
निदा फ़ाजली

अंदाज आरशाचा-इलाही जमादार




अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...

काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...

ज़खमा कशा? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...

माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या?हा पिंजरा असावा...

-इलाही जमादार