Wednesday, March 20, 2013

परी

काळ्या काळ्या ढगाआडून
आली एक परी
मोठे मोठे डोळे अन
दिसायलाही गोरी...

इवले इवले हात तिचे
गोबरे गोबरे गाल
ओठावरती फुलते हसू
ओठ लाल लाल...

आभाळभर स्वप्न तिच्या
डोळ्यात असतात खेळत
ढीगभर सुख तिच्या
पायात पडते लोळत

इवले इवले पाय मारून
निघते आमची स्वारी
चक्कर मारून आकाशाची
झोपी जाते परी...

-
ऋतू

मीलन

अंतरी पेटतो
जाळत जातो
तप्त गोळा ... वेदनेचा

होवूनी भणंग
खेळतो ज्वाळेत
पिऊनी प्याला ... आसवांचा

दूर कुठे
पेटला वणवा
चाबूक फटका ... वेदनांचा

शांत करा रे
आतली तगमग
पाऊस व्हावा ... दोन जीवांचा

- ॠतू