Monday, September 3, 2012

फक्त


माझ्या कवितेतील हिवाळा असावा मर्ढेकरांसारखा,
हिरवळ पसरावी बालकवींसारखी,
समुद्र फेसाळावा बोरकरांसारखा,
माणूस जगावा कुसुमाग्रजांसारखा,
नाद असावा भटांसारखा,
ठसका असावा शांताबाईंसारखा,
माझी कविता पच्च्कन थुंकावी कोलटकरांसारखी,
वाद प्रतिवाद घडावेत विंदांसारखे,
नाजूक असावी इंदिराबाईंसारखी,
कवितेने मुस्काट फोडावे चित्रेंसारखे,
संध्याकाळ बघावी ग्रेससारखी
.
.
.
एक कविता माझी अशी असावी
पण,
ती फक्त ’माझी’ कविता असावी!

-प्रथमेश किशोर पाठक

शहारा


दूर आभाळावरूनी
काही ढग आले खाली,
पायरीच डोंगराची
त्यांनी टेकायला केली
अलगद टेकवूनी
अंग पाय पसरले,
अंग अंग डोंगराचे
कसे ढग ढग झाले

गारव्याने डोंगराचे
पान पान तरारले,
कवि म्हणे डोंगराच्या
अंगभर काटे आले
-प्रथमेश किशोर पाठक

बघ सये...


थेंब थेंब पावसाचा तुला चिंब भिजवत असेल,
बघ सये तोच पाऊस तुला काही सांगत असेल

पावसाच्या जाळीमधून गार वारा वाहत असेल,
काळ्या काळ्या मेघांमधे इंद्रधनू फसले असेल,
ऐक गाणे पावसाचे, ते तुला साद घालत असेल,
बघ सये...

हिरव्या हिरव्या रानाaaचे न्हाणे आता झाले असेल,
आसमंतही सूर्यफुलांनी सर्वत्र सजले असेल,
द्रुष्टी पडता सूर्यफुलाची, तेही गाली हसले असेल,
बघ सये...

क्षितीजावरती सूर्य आता अस्ताला जात असेल,
ऊब काढून स्रुष्टीमधली हवेत गारवा भरत असेल,
ओल्याचिंब भिजल्या तुला, मिठीत माझ्या यायचे असेल,
बघ सये...

रात्रीचा एकांत हा, तुझ्या सोबतीला असेल,
पाऊसही खिडक्यांमधून, घरामधे शिरत असेल,
दार उघड बघ पाऊस, अंगणात माझ्या तोच असेल,
बघ सये...

-प्रथमेश किशोर पाठक.

Wednesday, August 22, 2012

या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय

 
काय करतो आपण आणि होतं काय
या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय...

राजकारणाच्या तव्यावर नेत्यांची पोळी,
कोणिही उठून रोज पब्लिक प्रोर्पटी जाळी
कोण बरोबर कोण चुक, कुणावर आता विश्वासच नाय....

अतिरेकी इथे दिवसा ढवळ्या घालतात गोळ्या
पब्लिक प्लेस, पोलिसांची घरं, चार भिंतीना जाळ्या
कुठे होइल फायरींग, कुठे पडेल बॊंम्ब, आता कसला हिशोबच नाय....

तरीसुद्धा आपण साजरा करतो स्वातंत्र्य दिवस
ज्या देशात देशाचाच ना कुणी उरलाय वारस
जो तो स्वातंत्र्य दिवसाला पसरून पडलाय हात-पाय.....

नाही जनाची तर असावी मनाची तरी लाज
स्मरावे एकदातरी हुतात्म्यांना ज्यांनी चढवला भरतावर स्वातंत्र्याचा साज
ठरऊ मिळून सारे किमान आज तरी तिरंगा रस्त्यावर पाडायचा नाय.....

काय करतो आपण आणि होतं काय,
या देशाचा आज-काल काय भरवसाच नाय...
-
ऋतू

Tuesday, August 21, 2012

खडू

(एक बाल कविता)
 
शाळेतल्या मास्तरांवर खडू बसला रुसून
म्हणतो कसा फळ्यावर लिहून मला टकतात पुसून.
 
 
कार्यक्रमाचे बोर्ड ह्यांच्या ठळक जाडे-भरडेजरासुद्धा
ठेवत नाहीत इकडून-तिकडून कोरडे.
 
मुलं तर फार द्वाडपणा करतातसांडून
शाई वह्यांवर मला त्यात रंगवतात.
 
नेने मास्तरही तसेच कहर करतातवर्गात
लिहीणे कमी आणि तुकडे करुन मारतात.
 
ह्या सगळ्यांची कंप्लेंट त्याने हेडमास्तरांकडे केलीवर्गात
मारून बुट्टी त्याने मास्तरांची फजीती केली.
 
मग हेडमास्तरांनी खडूला शांतपणे समजावलेसार्‍या
वर्गासमोर त्यानी खडूचे गुण गायले.
 
शाई घेतो शोषून तुमच्या चुका घेतो पोटातपांढरा
शुभ्र रंग काही नसतं निर्मळ मनात.
 
झिजून स्वत: तो तुम्हाला शिकवण देतोमुलांना
शिक्षीत करण्यात तो पूर्ण योगदान देतो.
 
ऐकून कौतूक त्याचे आभाळ ठेंगणे झालेआणि
तडक जाउन त्याने वर्गाचे दार गाठले.
 
आता खडूला कोणी-कोणी त्रास देत नाहीआणि
कुठल्याच तासाला खडू दांडी मारत नाही...
-
ऋतू

क्षितीज



पृथ्वीच्या निर्मीतीपासून उभं असलेलं क्षितीज आता दमलयं
रोजचा सूर्योदय आणि सूर्य़ास्त हल्ली झेलत नाही ते बरोबर
म्हणे...सूर्य़किरणांमध्ये भेसळ येते...

समुद्राचं पाणी आडवताना तडे जातायत आज-काल त्याला
म्हणे...लोकांनी कृत्रिम पध्द्तीने लिंपलेल्या
सीमेंटमध्ये भेसळ येते...

नेहेमीसारखं इंद्रधनू उतरत नाही आता क्षितीजावर
म्हणे... वाळू-माती उपसून उपसून
क्षितीजाला खड्डे पडलेत....

क्षितीज दिसत नाही पिवळं-सोनेरी किंवा तांबड
पांढर फटक पडत चाललयं रोज
भेसळयूक्त पृथ्वीत क्षितीज तरी कसं रंग बदलणार?

क्षितीज आता वाट बघतयं पृथ्वीच्या नवनिर्मीतीची
पृथ्वी बंद होवून चालू झाल्यावर तरी
सगळं सुरळीत होइल या आशेने!

-ऋतू

Monday, August 6, 2012

बारिश...

दूर तक आसमान नीला और धुला था
जिस वक्त सुबह ने आंखें खोलीं
घरों की मुंडेरों ने बताया... कुछ देर पहले बारिश हुई थी
 

किसी पत्ते पर ठहरी थी खूबसूरत बूंद
इंद्रधनुष की गोलाई लिए....धीरे से आगे बढ़ी
पत्ता हिला था हल्का सा... या उसका दिल धड़का था?
 

बूंद बही अपनी निशानी छोड़कर,
आखिरी सिरे पर जा टिकी...
फिर कहां रुकने वाली थी वो चंचल बूंद
 

पत्ता झुककर देखता रहा धरती की ओर...
मिट्टी में उसको मिलते हुए
पत्ते और भी थे शाख पर, सब चुप रहे
ये खेल देखकर हवा भी देर तक थमी रही
 

बारिश के बाद यही होता है अक्सर
ये जीवन का चक्र कहां रुकता है
हवा का नर्म झौंका है...
पत्ते ने मुस्कुराकर आसमान को देखा
सावन है...बारिश फिर होगी...

 
-कुहू