Wednesday, September 17, 2014

प्रिये पहा...

प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥

थंडगारवात सुटत । दीपतेज मंद होत ।
दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥

पक्षिमधुर शब्द करिति । गुंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥

सुखदुःखाविसरुनियां । गेलें जें विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥

- अण्णासाहेब किर्लोस्कर (संगीत सौभद्र)

No comments:

Post a Comment