मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.
-विंदा करंदीकर.
थोडं कवितेविषयी...
विंदांची ही बालकविता दिसायला सोपी, सरळ आणि साधी आहेच पण त्यातले नातेवाईकांचे संदर्भ हे रुपकात्मक असल्याने कवितेत अजून मजा आली आहे.
आमच्या मते ही कविता कुठेतरी आईकडच्या आणि बाबांकडच्या नात्यांविषयी बरचं काही सांगून जाते.सहाजिकच मावशीकडचा पापा सर्वाधिक गोड होवून जातो.
No comments:
Post a Comment