कविता...
एक मैत्रिण, प्रेयसी नसून प्रेयसी पलिकडची...
एक कट्टा, बेभान तरूणाई आवेशाची...
एक कोलाहल, झुंज शब्दांची भावनांची...
एक दुपार, अंगाची लाही लाही करणारी...
एक मिठी, सोडूनही न सुटलेली...
एक ओळ, सुचूनही न सुचलेली...
एक जाणीव, पुर्णत्वात अपूर्ण राहीलेली...
एक प्रवास, स्वप्नांची वाट न संपणारी...
.
.
.
कविता तुझी नी माझी...
-प्रथमऋतू
This comment has been removed by the author.
ReplyDeletepratyekani anubhavlela asta.. shabdaat fakta kahich janana mandta yeta !! .. perfect !!
ReplyDeleteSundar ahe. anubhav punarjeevit hoto
ReplyDeleteआमच्या कवितेत ह्या सार्या भावना, प्रतिमा कायम येवोत हीच देवाकडे प्रार्थना करतो...
ReplyDelete