Wednesday, December 29, 2010

शहरातली पहाट...

शहरातली पहाट...


पृथ्वीचं मित्राला बोलावण आलं
हाकेच्या सादानं नभी तांबडं फुटलं


शेतावर धुक्याची मऊ साय पसरली
दूर कुठेतरी एक मिठी सैल झाली


पापण्यातील स्वप्नांना कोणी लोटले दूर
काही उंबरठ्यावर आले निरोपाचे सूर 


थकलेले पाय काही जगाया चालती
काही धावणारे अन थकून निजती


यंत्रांनिही आळस झटकुनी दिला
टपरीवरूनी त्याला नमस्कार गेला


कुंडीतल्या तुळशीला वृंदावनाचा आभास
घरभर पसरला पत्ती चहाचा सुवास


कारखान्यानेही काळा उच्छ्वास सोडला
लोकलनेही आणि उपास तोडला


स्वर नळांचा काही खर्जात लागला
काही बातम्यांनी जगी कटाक्ष टाकला


शहराच्या पहाटेचे गोजिरेसे रूप
जीव इवलासा पण जगविते खूप


-प्रथमेश किशोर पाठक.

1 comment: