( ही कवितेवरची कविता आहे... एक कवी खूप दिवस काही सुचत नाही म्हणून उद्विग्नावस्थेत समुद्रावर जातो, भरलेल्या आभाळाकडे आणि समुद्राकडे कवितेचा आक्रोश करतो आणि एक कविता घेऊन घरी जातो...)
समुद्राकाठी उभे राहून मोकळ्या आभाळाकडे बघितल्यावर आतून एक संताप होतो.
मी दोन्ही मुठीत धरतो आभाळ आणि चुरगळून टाकतो जमेल तेवढं...
डोळ्यातला राग पाण्याबरोबर बाहेर पडतो हळूहळू.....
चुरगळलेलं मूठीतलं आभाळ उघडून बघतो
तर त्यावर डोळ्यातले थेंब शब्दं बनून उभे असतात ओळी-ओळीत!
उधाणलेला समुद्र माझ्याकडे बघत असतो
जणू काही ती कविता मी त्याला ऐकवणारच आहे.
पण मी सोडून देतो आभाळाचा कागद हातातून
आणि पाणी शब्दांनी पुलकीत होतं.
माझ्या अंगावर एक लाट येवून त्याच शब्दांकीत पाण्यानी मला भिजवून जाते
आणि घेवून जाते मी लिहीलेली आभाळावरची कविता...
मी बघत बसतो दूर जाण्यार्या आभाळाकडे
भूकेला...
परत एकदा शब्दांसाठी आतूरलेला....
घरी पोहोचतो,
कपडे काढतो आणि सुगंध पसरतो
पुन्हा एकदा भिजलेल्या समुद्रातल्या अक्षरांचा..
-ऋतू
समुद्राकाठी उभे राहून मोकळ्या आभाळाकडे बघितल्यावर आतून एक संताप होतो.
समोरचं आभाळ चिडवत असतं मला एखाद्या कोर्या कागदाप्रमाणे,
चिथवत असतं लिही काहीतरी .... पण मी शांत....
राग अनावर होतो आणि डोळ्यातून दोन थेंब गालावर घसरतात,चिथवत असतं लिही काहीतरी .... पण मी शांत....
मी दोन्ही मुठीत धरतो आभाळ आणि चुरगळून टाकतो जमेल तेवढं...
डोळ्यातला राग पाण्याबरोबर बाहेर पडतो हळूहळू.....
चुरगळलेलं मूठीतलं आभाळ उघडून बघतो
तर त्यावर डोळ्यातले थेंब शब्दं बनून उभे असतात ओळी-ओळीत!
उधाणलेला समुद्र माझ्याकडे बघत असतो
जणू काही ती कविता मी त्याला ऐकवणारच आहे.
पण मी सोडून देतो आभाळाचा कागद हातातून
आणि पाणी शब्दांनी पुलकीत होतं.
माझ्या अंगावर एक लाट येवून त्याच शब्दांकीत पाण्यानी मला भिजवून जाते
आणि घेवून जाते मी लिहीलेली आभाळावरची कविता...
मी बघत बसतो दूर जाण्यार्या आभाळाकडे
भूकेला...
परत एकदा शब्दांसाठी आतूरलेला....
घरी पोहोचतो,
कपडे काढतो आणि सुगंध पसरतो
पुन्हा एकदा भिजलेल्या समुद्रातल्या अक्षरांचा..
-ऋतू
खूपच छान कविता आहे.....
ReplyDeleteDhanyawad :)
ReplyDelete