Tuesday, April 26, 2011

पिपांत मेले ओल्या उंदिर -बा.सी.मर्ढेकर

उंदरासारखं जगणं झालेल्या आपल्या शहरातल्या माणसांच जगणं, जे जगायला आणि मरायला देखिल लाचार आहे, ते मर्ढेकरांनी ५० वर्षांपूर्वीच टिपून ठेवलं... पण आजही ते तितकच योग्य आणि समर्पक आहे...

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण;
गरिब बिचारे बिळातं जगले;
पिपांत मेले उचकी दउेन;
दिवस सांडला घार्‍या डोळी
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचचे पण;
मधाळ पोळे
ओठांवरती जमल तेही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

-बा.सी.मर्ढेकर

3 comments:

  1. shalet asatana pasun avadat asaleli kavita....ani ajunhi titkach vaet vatata hi kavita vachun.

    ReplyDelete
  2. मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. खालील लिंकवर ह्या विषयीची माहीती आहे.
    http://www.marathisrushti.com/?article=11604

    ReplyDelete