Wednesday, January 30, 2013

बुडबुडा

(क्षणभंगूर स्वप्ने जी बुडबुडयांसारखी आपल्या चिमटीत येतही नाही पण कुठेतरी असल्याचा भास देऊन आपल्याला सतावत रहातात..त्या स्वप्नांबद्दल...)

स्वप्न ही बुडबुड्यांसारखी असतात,
वार्‍याने भरून फुगून येतात,
बुडबुडे फुटतात थेंब बनतात,
स्वप्न फुटून अश्रू ओघळतात

बुडबुडे कायम चिमटीतून निसटतात,
क्षणभंगूर सुखाला डोळा मारतात,
स्वप्न बुब्बुळांच्या डोहात उगवतात,
पापण्यांच्या कडांवर निजून जातात

बुडबुडे माझ्या जवळच असतात,
स्वप्नांसारखे सकाळ करतात,
माझ्या स्वप्नात बुडबुडे असतात,
बुडबुड्यात स्वप्न फुटत रहातात

-प्रथमेश किशोर पाठक

No comments:

Post a Comment