(दूर जाण्याआधीचा स्पर्श हा आठवणीत कायम जवळच रहातो... तोच स्पर्श आठवणी सुगंधीत करताना...)
विस्कटुनी जाई स्पर्शगंध अबाधित
गात्र झाली फुफ्फुसे
बसली हुंगीत
बुब्बुळात कोरलेले
तुझे चित्र खास,
रंगाधले रंग
स्पर्शुनिया वास
स्पंदनात उसासे
दूर गेल्याचे,
आठवणीत रंग
जवळ आल्याचे
-प्रथमेश किशोर पाठक
No comments:
Post a Comment