Thursday, June 30, 2011

भिंत...


कसा पाऊस हा आला
काळ्या ढगांच्या मधून
कोणी थांबवा रे त्याला
तिला यायचे अजून

काल चंद्राच्या साक्षीने
तिला दिले मी वचन
उद्या चांदण्यांचा गजरा
तुझ्या दोई मी माळीन

हा भुरू भुरू वारा
मला बेभान भासतो
इंद्रधनूचाही रंग
मला बेरंग वाटतो

ती दूर कुठेतरी
माझा प्राण हा फाटतो
मग डोळीयांच्या नभी
माझ्या पाऊस दाटतो

असा कसा हा पाऊस
अवेळी बरसतो
भिंत थेंबांची बनून
दोन डोळे ओलावतो.

-प्रथमेश किशोर पाठक.

2 comments: