Thursday, June 30, 2011

नववधू




मी
नविन रूपात
नविन देहात
नविन नावात...अस्तित्व शोधताना

मी
जून्या स्म्रुतित
जून्या नात्यात
जून्या मित्रात...अस्तित्व शोधताना

मी आज खूप काही...
मी आज भावाच्या डोळ्यातील कडेकोट बंदोबस्त फोडू पहाणारे अश्रू...
मी आज आईच्या मनातील देवाला घातलेलं साकडे...
मी आज कन्यादानाच्या वेळेची बांबांच्या हातातील थरथर...
मी आज नवर्याच्या डोळ्यातील पहिल्या रात्रीची ओढ...
मी आज मंगलाष्टकातील लय...
मी आज मैत्रिणींच्या चर्चेचा विषय...
मी आज कुणा एकाचं दारू पिऊन झिंगण्याचं कारण...
मी आज अक्षतांमधील आशिर्वाद...
मी आज सासरच्या व्यक्तिंसाठीचा एक कुतुहलपूर्ण कटाक्ष...
मी आज एका शब्दवेड्यासाठी कवितेच कडवं...
मी आज अश्या अनेक रूपात वेषांतर करून फिरणारी बहुरूपी...
मी आज नववधू... अस्तित्व शोधताना

-प्रथमेश किशोर पाठक.



9 comments: