ग्रेस...
ग्रेस हा मराठीतील असा एक कवि आहे जो समजावून सांगणं महाकठीण काम... ग्रेस साठी प्रत्येक शब्द हा मोजून मापून वापरलेला असतो... तो स्वत:विषयी म्हणतो... "I am not a poet of an evening, i am a poet of a twilight" (मी संध्याकाळचा कवि नाही..मी सांजेचा कवि आहे)... त्याच्याच काही कवितांमधील काही ओळी...वाचलेल्या, ऐकलेल्या आणि उमजलेल्या... प्रत्येक कवितेच्या पेरिच्छेदानंतर त्याचं विश्लेषण दिलय (मला उमजलेलं)
१)
३)
जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .

हले काचपत्रातली वेल साधी
निनादून घंटा तश्या वाकल्या,
खिळ्यांना दिसेना कुठे क्रुस न्यावा
प्रभुने अशा पापण्या झाकल्या... ग्रेस
(परमेश्वर हे प्रकाशाचे प्रतीक आहे. वास्तवात जगणार्या पापी आणि पुण्यवान माणसांना हाच प्रकाश मार्ग दाखवत असतो. ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळे ठोकून मारणार्या मारेकर्यांनाही नंतरच्या विल्हेवाटीसाठी प्रकाशाची गरज भासली. बाहेर पाऊस कोसळत होता. सभोवताली अंधार होता. आणि प्रभूनेच पापण्या झाकल्यामुळे, प्रभुच्या डोळ्यातील अखंड प्रकाश शांतपणे निजून गेला मारेकर्यांसाठी...)
२) निनादून घंटा तश्या वाकल्या,

नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी ;निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनहि गारदी.
जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .
(सत्यभामा आणि रुक्मिणी ह्या कृष्णाच्या पत्नी. आपण रुक्मिणीपेक्षा उजवं असावं हे सत्यभामेला कायम वाटायच आणि म्हणून तिने कृष्णाने दिलेले पारिजातकाचे झाड आपल्या अंगणात लावले परंतू तिच्या मनात असलेल्या मत्सरापायी त्या झाडाची फुलं रूक्मिणीच्या अंगणात पडायची! ह्या कवितेतून निरनिराळ्या व्यक्तीमत्वांचं व्यक्तीचित्रण तर केलच आहे पण सगळ्यात शेवटी कृष्णाचं दू:ख हलकेच मांडलय..आणि तो दु:खाचा वसाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा एकांतवास आहे...)
No comments:
Post a Comment