चार तुझ्या शब्दांनी साध्या टळून जाइल नकारसुद्धा
एखाद्या झुळुकीचे होइल आनंदाने वादळसुद्धा
एखाद्या झुळुकीचे होइल आनंदाने वादळसुद्धा
सारी किरणे परतत नाहित सूर्याच्या हाकेवर आता
एखादा चांदणीत रमतो वयात आला नसूनसुद्धा
एखादा चांदणीत रमतो वयात आला नसूनसुद्धा
बुडबुड्यास ज्या रुबाब होता ,तो बुडला पण विरला नाही
त्याच्यामधला कणा हवेचा टिकलेला...कडकडूनसुद्धा
त्याच्यामधला कणा हवेचा टिकलेला...कडकडूनसुद्धा
सरण व्हायचे होते म्हणून अचेत झाली होती झाडे...
पाणी देणारा गेल्यावर.... अर्थ काय मग जगूनसुद्धा
पाणी देणारा गेल्यावर.... अर्थ काय मग जगूनसुद्धा
कडाडली जी वीज तिने तर लाखो ढग बेचिराख केले
मोरपिसारा तंद्रीमध्ये नाचनाचला.... भिजूनसुद्धा
मोरपिसारा तंद्रीमध्ये नाचनाचला.... भिजूनसुद्धा
तुझ्या नि माझ्या नात्यावरती टपून आहे दुनिया सारी
झाली आहे जगात अफवा जवळ जवळ पसरवूनसुद्धा
झाली आहे जगात अफवा जवळ जवळ पसरवूनसुद्धा
तिच्या जीवघेण्या मैत्रीने... पुढे जीव घेतलाच माझा
होकारावर शिक्कामोर्तब.... 'नाही नाही' म्हणूनसुद्धा
होकारावर शिक्कामोर्तब.... 'नाही नाही' म्हणूनसुद्धा
- प्रथमेश तुगांवकर
कातीलाना ना भाई वाह
ReplyDelete