Tuesday, March 22, 2011

हरवलेला कागद


हरवलेला कागद

दारू पिऊन डोकं जड झालं
की कविता लिहीण्याचा मूड होतो...
दरवेळेस कागद सापडतोच... असं नाही!
मग ग्लासमध्ये दारु ओतल्यासाखा मी-
मेंदूच्या कागदावर शब्द ओतत सुटतो...
सकाळी कागद सापडतोच... असं नाही!
एक कविता हरवल्याच दु:ख दिवसभर शरीरभर वेदना देतं...
सामान्य लोकं कदाचित त्यालाच ’हँगओव्हर’ म्हणत असावेत...
दिवस तसाच जातो,
पुन्हा रात्र,
पुन्हा दारु,
पुन्हा कविता,
पुन्हा हरवलेला कागद...
ह्या कवितांचा एक संग्रह काढीन म्हणतोय...
चालेल की,
असही, शब्दांना वास कुठे लागतो?

-प्रथमेश किशोर पाठक.

1 comment: