पृथ्वीच्या निर्मीतीपासून उभं असलेलं क्षितीज आता दमलयं
रोजचा सूर्योदय आणि सूर्य़ास्त हल्ली झेलत नाही ते बरोबर
म्हणे...सूर्य़किरणांमध्ये भेसळ येते...
समुद्राचं पाणी आडवताना तडे जातायत आज-काल त्याला
म्हणे...लोकांनी कृत्रिम पध्द्तीने लिंपलेल्या
सीमेंटमध्ये भेसळ येते...
नेहेमीसारखं इंद्रधनू उतरत नाही आता क्षितीजावर
म्हणे... वाळू-माती उपसून उपसून
क्षितीजाला खड्डे पडलेत....
क्षितीज दिसत नाही पिवळं-सोनेरी किंवा तांबड
पांढर फटक पडत चाललयं रोज
भेसळयूक्त पृथ्वीत क्षितीज तरी कसं रंग बदलणार?
क्षितीज आता वाट बघतयं पृथ्वीच्या नवनिर्मीतीची
पृथ्वी बंद होवून चालू झाल्यावर तरी
सगळं सुरळीत होइल या आशेने!
-ऋतू
No comments:
Post a Comment