Tuesday, January 17, 2012

अस्पृश्य

(कवी कायमच स्वत:ला आणि स्वत:च्या कवितेल्या निरनिराळ्या भुमिकेतून बघत असतो... हा कवी स्वत:ला ’घरात बाजूला बसलेल्या/ कावळा शिवलेल्या स्त्री’च्या भूमिकेत ठेवतोय... तिचा तो एकांत जर माझ्या कवितेला मिळाला तर माझी कविता कशी बहरेल...हे पडताळून बघतोय...)

जरी भासलो वाहत्या गर्दी सारखा तरी
माझ्याच तळघरात एकाकी मी
जशी प्रशस्त वाड्याच्या तळघरात तेवत बसलेली एखादी ती
जिला नुकताच कावळा शिवून गेलाय...

किंवा कधी पोटमाळ्याच्या अडगळीत
कौलातून झिरपणाऱ्या चंद्रधारा मोजत मोजत
बाजूला होऊन किती दिवस झालेत, हे मोजणारा मी...

कुणी फेटाळण्या आधीच, गर्दी पासून अलिप्त होत जात
त्या सर्वांच्या विरुद्ध्याच्या दिशेने चालत जात असताना
अचानक असं शांत वाटू लागतं
जशी गर्दी वाहून चालली आहे माझ्या भोवतालची...
आणि मी एकटाच कुठेतरी, स्वतःची जाणीव झाल्यागत
स्वतःचीच समाधी लावत, स्वतःच्याच सहवासात, स्वतःसाठी!

अचानक भान सोडून विचारतं मन स्वतःलाच कधी कधी
चार दिवस संपले नाहीत का अजून?
एकटाच चालत जातो आहेस अजून?

चल, पुन्हा एखादा प्रयत्न करून बघतो गर्दीतला होण्याचा...
मग सोडून समाधी वळतो पुन्हा, दिशा नसलेल्या गर्दीतून पुढे पुढे सरपटण्यासाठी...

चारच पावलं गेल्यावर पुन्हा जमतात ते कावळे
गर्दीवर घिरट्या घालत राहतात सारखे
जशी घरट्यात सोडलेल्या पिल्लावर नजर ठेवून घार
उंच आकाशात घिरट्या घालत राहते...

मी तर आतुरलेलाच असतो... अशुद्ध होण्यासाठी!
पुन्हा तळघर, पुन्हा काळोख, पुन्हा एकांत, पुन्हा समाधी!
मी तर आतुरलेलाच असतो... पुन्हा अस्पृश्य होण्यासाठी!

- अमेय घरत

Thursday, January 12, 2012

शब्दांकीत

( ही कवितेवरची कविता आहे... एक कवी खूप दिवस काही सुचत नाही म्हणून उद्विग्नावस्थेत समुद्रावर जातो, भरलेल्या आभाळाकडे आणि समुद्राकडे कवितेचा आक्रोश करतो आणि एक कविता घेऊन घरी जातो...)


समुद्राकाठी उभे राहून मोकळ्या आभाळाकडे बघितल्यावर आतून एक संताप होतो.
समोरचं आभाळ चिडवत असतं मला एखाद्या कोर्‍या कागदाप्रमाणे,
चिथवत असतं लिही काहीतरी .... पण मी शांत....
राग अनावर होतो आणि डोळ्यातून दोन थेंब गालावर घसरतात,
मी दोन्ही मुठीत धरतो आभाळ आणि चुरगळून टाकतो जमेल तेवढं...
डोळ्यातला राग पाण्याबरोबर बाहेर पडतो हळूहळू.....
चुरगळलेलं मूठीतलं आभाळ उघडून बघतो
तर त्यावर डोळ्यातले थेंब शब्दं बनून उभे असतात ओळी-ओळीत!
उधाणलेला समुद्र माझ्याकडे बघत असतो

जणू काही ती कविता मी त्याला ऐकवणारच आहे.
पण मी सोडून देतो आभाळाचा कागद हातातून
आणि पाणी शब्दांनी पुलकीत होतं.
माझ्या अंगावर एक लाट येवून त्याच शब्दांकीत पाण्यानी मला भिजवून जाते
आणि घेवून जाते मी लिहीलेली आभाळावरची कविता...
मी बघत बसतो दूर जाण्यार्‍या आभाळाकडे
भूकेला...
परत एकदा शब्दांसाठी आतूरलेला....
घरी पोहोचतो,
कपडे काढतो आणि सुगंध पसरतो
पुन्हा एकदा भिजलेल्या समुद्रातल्या अक्षरांचा..



-ऋतू



















Wednesday, December 14, 2011

और तो कोई बस ना चलेगा...


और तो कोई बस ना चलेगा हिज्र के दर्द के मारो का
सुबह का होना दुभर कर दे रस्ता रोक सितारोका
[हिज्र- Seperation दुभर- Difficult]

 झुठे सिक्को में भी उठा देते है अक्सर सच्चा माल
शक्ले देख के सौदा करना काम है इन बंजारोका


अपनी जुबॉँ से कुछ ना कहेंगे चूप ही रहेंगे आशिक लोग
तुमसे तो इतना हो सकता है पुछो हाल बेचारोका


एक जरासी बात थी जिसका चर्चा पहुचा गली गली
हम गुमनामो ने फ़िरभी एहसान ना माना यारोका


दर्द का कहना चिख उठो दिल का तकाज़ा वझा निभाओ
सब कुछ सहना चुप चुप रहना काम है इझ्झतदारोका
[दिल का तकाज़ा वझा- Heart's demand of self respect]

 - इब्न-ए-इन्शा

Wednesday, November 23, 2011

अंधेरा...

अंधेरा...

बचपन में सुना था मुहावरा
दियेतले अंधेरा
तब सही मायने पता चले...
अब जब सोच रोशन हुई,
तब पुछा अपने आप से,
क्या है वजूद अंधेरे का?
उस वजूद का इकरार इस दिवाली हुआ...
पता चला क्युँ अंधेरा युँ
दबे पाँव, दियेतले सहमा-सहमा रेहेता है,
क्युँ कसूरवार बच्चे की तरह
यूँ डरा-डरा फ़िरता रेहेता है!
हमने तो यूँ रोशनी के लिये
दरवाजे- खिडकीया सब खोल दी,
अंधेरे के लिये उन्हीके बगल में दिवारे बना दी,
अब जब दरवाजा खोलतेही,
सामने रोशनी पातेही हम उसे गले मिलने जाते है,
अंधेरा दबे पाँव, चूप चाप से
अपनी परछाई बनके अपने पैरो से लिपट जाता है...
हम तो रोशन होते है, अंधेरा पैरोतले कुचल जाता है!

-प्रथमेश किशोर पाठक

Tuesday, November 8, 2011

देव म्हणजे एक IT firm आहे

 देव म्हणजे एक IT firm आहे

देव म्हणजे एक IT firm आहे आणि आपण त्याचे client.
आता अश्या वेळी आपल्या आयुष्याचे Project किंवा Maintenance कसा होईल?

पहिल्यांदा आखला जाईल तो Project Plan.
आपल्याला कुठल्या जातीत, कुठल्या Class मध्ये जन्माला यायचं आहे?
Aggrement, clauses आणि packages ठरतील,
त्यानूसार Implimentation होईल आणि आपण जन्माला आल्यावर पहिलं वर्ष AMC (Annual Maintenace Contarct) free मिळेल.

AMC मध्ये तुमचा श्वास चालू राहिल ह्याची जबाबदारी घेतली जाईल फक्त...
Part ची Guarantee त्यात include होणार नाही.
ऊद्या उठून हात, पाय, डोळे आणि इतर कुठल्याही Part ची Replacement AMC मध्ये नसेल...
त्यासाठी Extra charge! हं आता तुम्हाला त्याचीही  AMC हवी असेल  तर काही packages आहेत...  
पण त्यालाही  guarantee मिळणार नाही.
म्हणजे
...

)पूर्ण maintenance मध्ये १६ सोमवार, ४ श्रावणी सोमवार, वर्षातून ३दा कुल्दैवताचे दर्शन, किंवा
इतर धर्मांनप्रमाणे उपास -तापास extra घ्यावे लागतील.
)Memory, Hard disk, power supply, या सारख्या गोष्टी खराब झाल्यास मिळणार नाही ... Company जबाबदार नाही.
) Agreement penalty Clause:- AMC मध्ये काही गडबड झाल्यास पुर्नजन्माची penalty फक्त
बाकी सगळे Clause पुढे लागू होतात...

.
.
.
अरे बापरे १० Mail alert server... झोपला बहूतेक!
देवा तू IT firm नको रे बाबा तू देवच बरा.
तूच आता मला वाचव रे बाबा

...

ऋतू









Tuesday, October 11, 2011

मूर्खांची लक्षणे: समर्थ रामदास स्वामी- दासबोध


समर्थ रामदास स्वामींचा दासबोधहा एक निव्वळ ग्रंथ नसून त्यात वैश्विक तत्वज्ञान सामवलेलं आहे. आज ह्या ब्लॉग मार्फत आम्ही समर्थ दासबोधातील "मूर्खांची लक्षणे" हया समासातील काही श्लोक येथे सार्थ प्रस्तूत करायचे धाडस करीत आहोत! मूर्ख कोण असतो ह्याची अनेक लक्षणे समर्थांनी लिहून ठेवलियेत, त्याचप्रमाणे "पढतमूर्खांची लक्षणे", "गुरू कोण?", "शिष्य कोण?" असे कित्येक प्रश्न समर्थ आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीतून दर्शवतात... सरळ साधे काही जगण्याचे नियम हेच “दासबोध” आहे... जय जय रघुवीर समर्थ!!



१) परस्त्रीसीं प्रेमा धरी| श्वशुरगृही वास करी |
कुळेंविण कन्या वरी| तो येक मूर्ख ||
(
जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासर्‍याकडे जाऊन राहतो, कूळ न बघता लग्नाला होकार देतो...तो मूर्ख)


२) आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||
(जो स्व:ताचेच गुणगान करतो, स्व:ताच्या घरातही पाहूणा असल्यासारखा वागतो, वडिलांच्या किर्तीवर भास मारतो... तो मूर्ख)

३) अकारण हास्य करी| विवेक सांगतां न धरी |
जो बहुतांचा वैरी| तो येक मूर्ख ||
(विनाकारण हसत बसतो, हुशार लोकांशी संबंध ठेवत नाही, जो खूप लोकांशी शत्रुत्व बाळगतो...तो मूर्ख)

४) बहुत जागते जन| तयांमध्यें करी शयन |
परस्थळीं बहु भोजन- | करी, तो येक मूर्ख ||
(सगळे जागे असताना जो त्यांच्यामधे जाऊन झोपतो (night out करताना ध्यानात ठेवा), दुसर्‍या घरी नको इतकं जेवतो..तो मूर्ख)

५) औषध न घे असोन वेथा| पथ्य न करी सर्वथा |
न मिळे आलिया पदार्था| तो येक मूर्ख ||
(आजारी असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, काहिही अरबट चरबट खाणारा मूर्ख... नकळत समर्थ सांगतात junk food खाऊ नये)

६) आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें
| तो येक मूर्ख ||
(मान न ठेवता जो बोलतो, कोणी विचारलं नसतानाही आपलं मत व्यक्त करतो (
facebook users साठी), अनैतिक गोष्टी अंगिकारतो...तो मूर्ख) 

७) दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें
| तो येक मूर्ख ||
(पहिली ओळ तर साधी सरळच आहे समजायला, सगळे असतना दोन्ही हातानी जो डोके खाजवतो...तो मूर्ख)
 

८) कळह पाहात उभा राहे| तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे
| तो येक मूर्ख ||
(दोघे भांडत असताना त्याची मजा बघत जो तसाच उभा राहतो, खरं माहित असूनही खोटं सांगतो..तो मूर्ख)
 

९) लक्ष्मी आलियावरी| जो मागील वोळखी न धरी |
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी
| तो येक मूर्ख ||
(श्रीमंत झाल्यावर जो आधिच्या ओळखी विसरून जातो, तो मूर्ख)



१०) आपलें काज होये तंवरी| बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी
| तो येक मूर्ख ||
(आपलं काम होईपर्यंत जो अत्यंत विनम्र असतो आणि आपलं काम झालं की जो इतरांचं काम करायला मदत करत नाही..तो मूर्ख)